(संतोष पवार/ जाकादेवी)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद – खंडाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद – खंडाळा येथील मुलींचा क्रिकेट संघ सातारा येथे घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेत उपविजेता ठरला.
विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाटद खंडाळा संघाने अनुक्रमे कोल्हापूर व सातारा या संघांचा पराभव करून अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली.सांगली संघा विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात वरवडे भाग शाळा वाटद खंडाळा संघाला पराभवाचा सामना करावा लागला व उपविजेता स्थानावरच समाधान मानावे लागले.
या उपविजेता ठरलेल्या संघात शिवानी गोरे (कर्णधार), संचिता जाधव,मनाली निंबरे, दीक्षा चव्हाण,जयश्री शितप, मीनाक्षी शितप,सलोनी धातकर, वेदिका लोकरे, वेदिका चौघुले, सानिका पंडित, सानिया महाकाळ, तन्वी सावंत व पूर्वा सावंत या खेळाडूंचा समावेश होता. या संघातील खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून शाळेतील क्रीडा शिक्षिका सौ.नम्रता सावंत,श्रीम.पल्लवी बोरकर आणि शाळेचे माजी विद्यार्थी भूषण पाटील यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
या संघातील सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, सर्व संस्थाचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.