(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय करबुडे-लाजुळ येथील आठवी मधील चार विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत उज्वल यश संपादन करून शासनाची शिष्यवृत्ती पटकावली.
१) तेजस्वी शितप ( ओबीसी ९)
२) विशाल गोवळकर ( ओबीसी १ )
३) सम्यक सावंत ( एस. सी. १७)
४) कार्तिकी साळवी ( जनरल १२ ) या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त केली. या सर्व विद्यार्थ्यांस पुढील चार वर्ष रुपये १२००/- प्रती वर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कुवळेकर, एन. एम.एम. एस परीक्षा विभाग प्रमुख प्रियांका चव्हाण तसेच सुरेश पाटोळे, बाहुबली नाईक, गजमल बहिरम, जान्हवी जाधव आणि अभिजीत जोशी यांनी या विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. विद्यालयातील सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था आणि पालक वर्गातून अभिनंदन करण्यात आले.