(मंडणगड)
पृथ्वी, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांवर आधारीत राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात मंडणगड तालुक्यातील अडखळ या ग्रुप ग्रामपंचायत कोकण विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवीला आहे याबद्दल ग्रामपंचायतीस राज्य शासनाकडून पन्नास लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक घोषीत करण्यात आले आहे. माजी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबवण्यात आले होते यामध्ये राज्यातील १६४१३ ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदविला होता. स्थानीक स्वराज्य संस्थानी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्थ यंत्रणांचे माध्यमातून करण्यात आले. ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी योगेश कदम, विस्तार अधिकारी राजेंद्र मोहीते, कृषि नोडल अधिकारी विशाल जाधव, सरपंच सौ. करिना रक्ते, उपसरपंच सुरज पाडावे,ग्रामसवेक दिनेश शिगवण व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
मुल्यमापानात प्राप्त गुणांचे आधारे लोकसंख्या निहाय विजेते घोषीत करण्यात आले. यामध्ये अडीच हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कोकण विभाग स्तरावर अडखळ ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली असून ग्रामपंचायतीस लवकर शासनाकडून पारीतोषिक देण्यात येणार आहे.