(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील हरेकरवाडी येथील महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला आरोपीला 452 कलमाखाली 1 वर्ष सश्रम कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आली आहे. तसेच 354 कलमाखाली पुन्हा एक वर्षाचा सश्रम कारावास व 1500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा देवरूख प्रथमवर्ग न्यायाधीश तारे यांनी सुनावली आहे. दीपक शांताराम हरेकर (रा. हरेकर वाडी, तालुका संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, महिला आपल्या घरातील पडवीतील पलंगावर झोपलेले असताना दीपक हा वाईट उद्देशाने यांचे घराचे मागच्या भिंतीला सीडी लावून कौलावर चढून कौले काढून पडवी मध्ये उतरून घरात प्रवेश केला. पडवीत झोपलेल्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबतची फिर्याद महीलेने संगमेश्वर पोलिस स्थानकात दिली होती. पोलिसांनी आरोपी दीपक वर भादविकलम 452, 354 नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात देवरूख प्रकरणात खटला दाखल करण्यात आला होता. आरोपी विरोधात गुन्हा साबित झाल्याने देवरूख येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तारे यांनी शिक्षा सुनावली. सरकारी वकील सुप्रिया वनकर यांनी पीडित महिलेच्या वतीने काम पाहिले व आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. तर तपासीक अधिकारी म्हणून चंद्रकांत कांबळे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी- पोलीस कॉन्स्टेबल लांडगे यांनी काम पाहिले.