करोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राजकीय आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
करोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राजकीय आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर सीबीआयनं मुंबईत ठिकठिकाणी छापासत्र सुरू केलं आहे.
अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरन हत्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक (निलंबित) सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारनं पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्यावर ठपका ठेवून त्यांचीही या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप सिंग यांनी केले होते.