सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल ७ हजार ५१० पदांच्या बंपर पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक आदि पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क गृह विभागात दुय्यम निरीक्षकची ६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३२ हजार ते १ लाख १ हजार ६०० रुपये पगार दिला जाईल.
तांत्रिक सहाय्यकचे १ पद भरले जाणार असून यासाठी पदवीधर ही पात्रता आहे. या पदासाठी दरमहा २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपये पगार दिला जाईल.
मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये पगार दिला जाईल.
लिपिक-टंकलेखकच्या ७ हजार ३५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांचा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. वेग असणे आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार २०० ते ६३ हजार २०० रुपये पगार दिला जाईल.
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होणार असून उमेदवार ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. १७ डिसेंबर रोजी या पदांसाठी मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.
अ.क्र | पदाचे नाव | पदांची संख्या |
01. | दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क विभाग | 06 |
02. | तांत्रिक सहाय्यक | 04 |
03. | कर सहाय्यक | 468 |
04. | लिपिक टंकलेखक | 7035 |
एकूण | 7510 |
अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे आणि अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
आवेदन शुल्क
- खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 544/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल.
- मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल.