(संगमेश्वर)
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना संगमेश्वर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सुरेंद्र रणसे तर सचिवपदी रवींद्र दरडी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना संगमेश्वर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्राथमिक शिक्षक पतपेढी, देवरुख येथील सभागृहात जिल्हा सरचिटणीस श्री.सुरेंद्र रणसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 22 एप्रिल रोजी निवड करण्यात आली. सदर कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस श्री.दिलीप देवळेकर यांनी पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सभेचे प्रास्ताविक रवींद्र दरडी यांनी केले सभेसाठी तालुकभरातून सव्वाशेच्या आसपास सभासद उपस्थित होते.
याचवेळी जिल्हा सरचिटणीस श्री.सुरेंद्र रणसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने रणसे यांच्या कार्यप्रणालीवर व शुभेच्छापर मनोगते श्री.रवींद्र दरडी,श्री.खवरे, श्री.संदेश सावंत ,श्री.नारायण शिंदे, श्री.माणिक पाटील, श्री.बोकडे, सौ.स्मिता शिंदे, सौ.सायली सावंत, श्री.बावस्कर आदींनी व्यक्त केली. अंतिमतः सुरेंद्र रणसे यांनी नूतन कार्यकारिणी माझ्या वाढदिवसाची सुंदर भेट असल्याचे सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष श्री.देवळेकर यांनी मंत्री ना.उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संघटनेची वाटचाल सुरू असून भविष्यात गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कामकाज करण्यावर मंत्री महोदय यांचा मानस आहे, शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटलिस्ट मध्ये येण्यासाठी संघटना आपल्या सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवणार आहे. प्रशासकीय कामकाजामुळे शिक्षकांना येणारा मानसिक तणाव यापुढे नक्की दूर केला जाईल, असे प्रतिपादन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वानुमते जिल्हा सरचिटणीस श्री.सुरेंद्र रणसे यांच्याकडे देण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
रवींद्र दरडी-सरचिटणीस, संदेश सावंत-उपाध्यक्ष, विकास मोरे-कार्याध्यक्ष, धनाजी मोटे-कोषाध्यक्ष, संजय जाधव-कार्यालयीन चिटणीस, शशिकांत करंडे-तालुका सहसचिव, नथुराम पाचकले-तालुका संघटक, समाधान पलोदकर-प्रसिद्धी प्रमुख, पंडितराव ढवळे-विभागीय अध्यक्ष
महिला प्रतिनिधी
सौ.स्मिता दत्ताराम शिंदे, सौ.सायली संदेश सावंत, सौ.बबिता नारायण शिंदे, सौ.नेहा रवींद्र दरडी
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण शिंदे यांनी केले