(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (मान्यताप्राप्त) तालुका शाखा खेडच्या वतीने प्राथमिक शिक्षकांचे यूपीएससी, मेकॅनिकल, इंजिनियर, डिग्री, डिप्लोमा धारक, १० वी, १२वी उत्तीर्ण, ५वी, ८ वी शिष्यवृत्ती धारक, MTS ,BDS , प्रज्ञाशोध, जवाहर नवोदय विद्यालय गुणवंत पाल्य, सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी, विस्तार अधिकारी,आदर्श शाळा, जिल्हा परिषद शाळांमधील शिकणारे पाचवी, आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालय निवड झालेले विद्यार्थी या सर्वांचा सत्कार व शुभेच्छा सोहळा गणेश मंगल कार्यालय भरणे खेड येथे संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री शरद भोसले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या २२ जुलै या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधत ६१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त आणि कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संघटना त्याग आणि सेवा, अन्यायाची चीड, न्यायाची चाड या आपल्या ब्रीद वाक्याप्रति कटीबद्ध असलेल्या संघटनेचा हा सोहळा.
या कार्यक्रमासाठी उपस्थित शिक्षण विस्तार अधिकारी श्री संतोषजी भोसले साहेब यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही संघटना केवळ शिक्षकांच्या प्रश्नांसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी देखील आग्रही असणारी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कौतुकास्पद काम करणारी आग्रही संघटना असल्याचे गौरव उद्गार काढले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गुणवंत पाल्यांच्या पाठीवर मारलेली शाबाशीची थाप ही या विद्यार्थ्यांसाठी असणारे सर्वात मोठे प्रेरणादायी काम आपण करतात अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अजित भोसले, जिल्हा सल्लागार श्री.परशुराम पेवेकर, जिल्हा संघटक श्री.संजय गडाळे, दापोली समिती तालुका अध्यक्ष श्री.जावेद शेख, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका सचिव श्री. एकनाथ पाटील, जुनी पेन्शन संघटना सचिव श्री. गणेश सानप, केंद्रप्रमुख श्री. विकास दळवी, श्री.विनायक नलावडे, शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन श्री.सुनील सावंत, तालुका सचिव श्री.अशोक आकुसकर, कार्याध्यक्ष श्री.शरद शिंदे, कोषाध्यक्ष श्री.नरेश ठोंबरे, उपाध्यक्ष श्री.अनिल यादव, तालुका मुख्य संघटक श्री.संतोष यादव, कार्यालयीन चिटणीस श्री.अर्जुन गावीत, प्रसिद्धी प्रमुख श्री.दिलीप यादव, सहचिटणीस श्री धर्मपाल तांबे, श्री शंकर लोखंडे धामणंद प्रभागातील श्री राजकिरण मोरे, श्री गोकुळ बांगर, तसेच श्री. तुकाराम काताळे,श्री नारायण शिरकर, श्री. नवनीत घडशी, श्री. संतोष मोरे,श्री.महेश जाडे, श्री बबन मोरे, श्री. ईश्वर तागड, श्री.कृष्णा पवार, श्री.रामराव लवटे,श्री. चंद्रकांत पवार,श्री. सुधाकर बामणे, श्री. दिलीप देसाई, श्री.यडू केकान, श्री. रमेश शेळके,श्री.रामकिसन वारे, महिला प्रतिनिधी सौ.मंगला सोनावणे, सौ.स्वाती यादव, सौ सुविधा सावंत, सौ.दीप्ती यादव सौ.शर्वरी भोसले, सौ. आशा आकुसकर यांचेसह अन्य संघटना सभासद, बंधू भगिनी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.