( चिपळूण )
विद्यार्थी व पालकांच्या न्याय हक्कासाठी सतत न्याय मिळण्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला १ ऑगस्ट रोजी १७ वर्ष पूर्ण झाली. त्याच अनुषंगाने चिपळूणमधील विद्यार्थी विद्यार्थीनींनी युवकांनी काल १७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत अध्यक्ष हिंदुत्वाची ठाकरी तोफ राजसाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन खेड नगरपालिका नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्हा संपर्क अध्यक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग अमोलजी साळुंखे, रत्नागिरी जिल्हा सचिव संतोषजी नलावडे साहेब, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, शहराध्यक्ष अभिनव भुरण यांच्या उपस्थितीत चिपळूण मधील महाविद्यालयातील असंख्य युवक युवतींचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये जाहीर प्रवेश चिपळूण शहर जनसंपर्क मध्यवर्ती कार्यालय येथे पार पाडला.
यावेळी उपस्थित सर्व युवक युवतींना मा.वैभवजी खेडेकर यांनी आपल्या खास शैलीमध्ये संबोधित केले. याप्रसंगी सर्व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, उप-जिल्हाध्यक्ष गुरूनाथ नागे तसेच चिपळूण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर कदम, विद्यार्थिनी तालुकाध्यक्ष रचना मसुरकर, विद्यार्थी तालुका सचिव सोहम पाथरे यांच्या सौजन्यातून पार पाडले गेले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश इंदुलकर यांच्यामार्फत केले गेले .
या प्रसंगी औचित्य साधून येत्या काही महिन्यात चिपळूण मधील प्रत्येक महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे युनिट असेल आणि विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना चिपळूण तालुकाध्यक्ष सागर कदम यांच्यामार्फत दिले गेले, जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी उपस्थित श्री मंगेश घुले (चिपळूण शहर सचिव), श्री अनिकेत कदम (चिपळूण शहर उपाध्यक्ष, मुरादपूर), श्री. अनिकेत कांबळे (चिपळूण उपशहर अध्यक्ष खेंड), श्री. सुदेश की फके (चिपळूण शहर विभाग अध्यक्ष, उक्ताड), तसेच महाराष्ट्र सैनिक सुजल महाजन, रुची जाधव, चैतन्य कुंभार, उत्कर्ष खानोलकर, पृथ्वीराज पाटील, ओंकार चव्हाण, वर्षा कुंभार, अभिषेक भोसले, सनी सलगे, अभिषेक बंडके, सुजल शिगवण, अनंत बांदिवडेकर, सर्विल लाड, राज पवार, साई वारे, रितेश बंगाल, सुजल शेडगे, आकाश गमरे, तुषार धामणे, जय जाधव, निलाजन जाधव, अस्मिता साळवी, श्रावणी सुर्वे, प्रेरणा शिर्के, धनश्री माळी, वैभवी तांम्हणकार, सोनाली कदम, मयुरी नाईक, अंतरा पाटणे, आदी उपस्थित होते.