महाराष्ट्राच्या राजकारणातील डॅशिंग नेते नारायणराव राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे यापुढील काळात कोकणच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.
कोकणचा अविकसितपणा आणि मागासलेपणाचा लागलेला कलंक मी धुवून काढीन, दूर करेन. यापुढे माझ्या कोकणाला कोणीही मागासलेला अगर अविकसित म्हणू शकणार नाही अशाप्रकारे कोकणची मी सर्वांगिण प्रगती आणि विकास घडवून आणीन अशी घोषणा करून ती १९९० नंतरच्या दशकात प्रत्यक्ष सत्यात साकारणारे, कोकणचे भाग्यविधाते अशी सार्थ उपाधी लाभलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे, कोकणातील सिंधुदर्गचे पॉवरफूल डॅशिंग व कर्तबगार सुपूत्र. प्रचंड ध्येयवाद, जिगरबाजपणा, असामान्य कर्तृत्व, अफाट जिद्द, असीम निष्ठा, निर्भयपणा, कोणतेही आव्हान स्वीकारण्याची वृत्ती, विलक्षण बुध्दिमत्ता, प्रबळ इच्छाशक्ती, अखंड ज्ञानपिपासूवृत्ती, कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी, अदभूत चिकाटी, धारदार डॅशिंग नेतृत्व, परखड स्पष्टवक्तपणा, कठोर कर्तव्यनिष्ठा, राजकीय डावपेचात अन् मुत्सद्देगिरीतही अग्रेसर अशा सर्व गुणसंपन्न, आगळ्यावेगळ्या लोकविलक्षण गुणांचा सुरेख संगम नारायणराव याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. त्यांचे नेतृत्वही लोकाभिमुख व संघटनकुशल आहे.
चागले विधायक काम करणाऱ्याच्या मागे खंबीरपणे उभ राहण्याची, पक्षभेद विसरून सर्वांना सर्वतोपरी मदत करण्याची त्यांची वृत्ती. एकाचवेळी लक्ष्मीचा व सरस्वतीचा वरदहस्त लाभणे ही तशी अशक्य कोटीतील गोष्ट. परंतु नारायणरावांनी कठोर परिश्रमाने, ध्येयवादी जिद्दीने, कल्पकतेने ते साध्य केले आहे, प्राप्त केले आहे. नारायणराव राणे यानी राजकारण व उद्योग व्यवसायामध्ये प्रचंड यश मिळविले, सन्मान प्राप्त केले त्यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली आहे. अशा या पॉवरफुल नेत्याची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कोकणच्या विकास अधिक गतिमान होईल यात तिळमात्र शंका नाही.