(संगमेश्वर / विवेक शेट्ये)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलाचे काम करणाऱ्या मजुराचा वर्षाच्या सुरुवातीलाच हृदयविकाराने मृत्यू झाल्याने व्यक्त होत आहे. सदरच्या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नववर्षाच्या सुरुवातीचा आनंद साजरा करीत सोनवी पुलाचे काम करणारा मजूर कृष्णा अभी साहू (वय 23, सध्या राहणार माभळे मुळगाव उडीसा) हा मजूर रात्री झोपी गेला होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. रात्री झोपल्यानंतर मध्यरात्री त्याला उलटी झाली, त्यानंतर परत तो झोपला होता. मात्र सकाळी उठवण्यासाठी गेलेल्या इतर काम करणार त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर त्याला संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात आले असून याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात श्री जॉय डायनॉक्स यांनी खबर दिली आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहे.