(मलकापूर)
बुलढाण्या जिल्ह्यातील मलकापूर शहराजवळून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहा वर पहाटे तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले आहेत. बुलढाण्या जिल्ह्यातील मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर झजोरदार धडक झाली असून त्यात सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मलकापूर येथील लक्ष्मी नगर उड्डान पुलावर ही घटना घडल्याची माहिती आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर उड्डान पुलावर विरुद्ध दिशेने येत असलेल्या दोन ट्रॅव्हल्समध्ये जोरदार टक्कर झाली. मध्यरात्री झालेला हा अपघात इतका भीषण होता की, त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. याशिवाय पुलावरून काही तरी मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. अपघाताच्या घटनेत सुमारे ३० प्रवासी जखमी असून त्यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.