(वेळणेश्वर /उमेश शिंदे)
गुहागर तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर आयोजित मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेत वीर मराठा काळसुर कौढर हा संघ अजिंक्य ठरला आहे.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतील जानवळे फाटा येथील (गोल्डन व्ह्यू मैदानावर ) पार पडलेल्या या स्पर्धेत अनेक मराठा समाजाचे दिग्गज नेते, सेलिब्रेटी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये एकुण 20 संघ मालक आणि साडेतीनशे खेळाडू सहभागी झाले होते. तीन दिवस ही स्पर्धा सुरू होती स्पर्धेतील प्रथम विजेत्यां वीर मराठा काळसुरकौढर संघाला (संघ मालक सचिन गुजर ) ५५ हजार ५५५, रुपये व चमचमती ट्रॉफी तर द्वितीय विजेत्या सिद्धिविनायक वरवेलि (संग मालक कुणाल देसाई ,आशिष विचारे) या संघाला ३३ हजार ३३३, रुपये व चमचमती ट्रॉफी तर तृतीय विजेत्या जय सोनसाळवी (संघमालक प्रकाश साळवी) जामसुत या संघाला ११ हजार, तर चतुर्थ स्वामी समर्थ (संगमालक अमित साळवी) चिखली या संघाला ७ हजार व चमचमती ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून सर्वेश साळवी तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज शिंदे, उत्कृष्ट फलंदाज, सर्वेश साळवी, उत्कृष्ट गोलंदाज प्रकाश साळवी, तर संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून मॅन ऑफ द सिरीज विराज विचारे यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेसाठी मराठा समाजातील दिग्गज नेते केशवराव भोसले, आमदार भास्कर जाधव, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार विनय नातू माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम ,संभाजी ब्रिगेडचे सुधीर भोसले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. तसेच इतर समाजातील सुद्धा नेतेमंडळी कार्यकर्त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली होती.
क्षत्रिय ज्ञाती मराठा संघटना, गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर ही मराठा समाजाच्या सर्व गावातील तरुणांना एकत्र करणे व क्षत्रिय मराठा भवन उभारणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मराठा प्रिमियर लीगचे आयोजन केलेले होते. जिल्ह्यातील अशा स्वरुपाची ही प्रथमच स्पर्धा आहे. मराठा प्रिमियर लीग ही केवळ क्रिकेटची स्पर्धा नसून मराठ्यांचा महामेळा होता. या स्पर्धेच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील सर्वदूर पसरलेल्या मराठा समाज बांधवांना एकाच छताखाली आणण्याचा हा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाल्याचं क्षत्रिय मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अँड. संकेत साळवी आणि सचिव अमिष कदम यांनी सांगितले.
मराठ्यांचा क्रिकेटचा रणसंग्राम खेळीमेळीच्या व क्रिकेट प्रेमींच्या उत्साहात निर्विघ्न शांततेत यशस्वी करण्यासाठी मराठा समाजातील सर्वच तरुणांनी अध्यक्ष एडवोकेट संकेत साळवी आणि सचिव अमिष कदम यांच्या नेतृत्वाखाली तरूणांनी खूप मेहनत घेतली. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचे समालोचन श्री आदवडे, पवार, टेरवकर, सावंत सर यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकली.
फोटो १) प्रथम क्रमांक विजेता वीर योद्धा कौंढर काळसूर संघाला गौरविताना द ग्रेट मराठा श्री केशवराव भोसले व मान्यवर
फोटो २) दुसऱ्या छायाचित्रात श्री सिद्धिविनायक वरवेली संघाला गौरविताना माजी खासदार श्री निलेश राणे व इतर मान्यवर
(फोटो छाया : उमेश शिंदे, वेळणेश्वर)