(मुंबई)
राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मराठा आरक्षणासंदर्भातील राजपत्र मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आले. सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या अध्यादेशाबाबत मनोज जरांगे यांनी वकिलांशी आणि समाजबांधवांशी तब्बल तीन तास चर्चा केली यांनतर जरांगे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.
Navi Mumbai, Maharashtra: Maratha Reservation activist Manoj Jarange Patil says, "Chief Minister Eknath Shinde has done a good job. Our protest is now over. Our request has been accepted. We will accept the letter from him. I will drink juice by the hands of the Chief Minister… pic.twitter.com/TAhS6ZANKj
— ANI (@ANI) January 26, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.
पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी,”सरकारने सग्या-सोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला असून तो मला देण्यात आला आहे. राज्यातील मराठा बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणपत्र सापडली आहेत, त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल, असे जरांगे पाटील यांनी नमूद केले. एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे काम केले आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
दरम्यान सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या माण्य केल्याने एपीएमसी मार्केटच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. अण्णासाहेब पाटील यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भूमीका काही आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.
#WATCH | Navi Mumbai: Maratha reservation activists celebrate after Manoj Jarange Patil announces to end the protests today as the government has accepted their demands pic.twitter.com/V1KxosEHRm
— ANI (@ANI) January 27, 2024