(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीराला व्यायाम किती गरजेचा आहे याचे महत्व पटवण्यासाठी सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांकडून घालून घेऊन त्याचे फायदे सांगितले गेले व स्वतः त्याची सवय लावून घ्या आरोग्य सदृढ ठेवा, असा संदेश या उपक्रमातुन देण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सुरेंद्र माचीवले, महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, प्रा अवनी नागले, प्रा. तेजश्री रेवाळे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.