(जाकादेवी/वार्ताहर)
मतदान हा माझा हक्क आहे आणि मी तो बजावणारच! तो हक्क बजावण्यासाठी माझे नाव माझ्या मतदार संघात आले आहे की नाही हे बघणे आवश्यक आहे. त्यासाठी माझी मतदार म्हणून नोंदणी होणे आवश्यक आहे तरच मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो असे प्रतिपादन रत्नागिरीच्या निवडणूक नायब तहसीलदार माधवी कांबळे यांनी मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे मतदार दिनी केले.
मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे रत्नागिरी येथे आज दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मतदार दिन राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयाचा साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला होता रत्नागिरीच्या निवडणूक नायब तहसीलदार माधवी कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयात नव मतदार विद्यार्थ्यांची नोंदणी निवडणूक नायब तहसीलदार माधवी कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. एकूण ५० नवे मतदार नोंदणीकृत झाले.
मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पटलेले विचार, राष्ट्रहित, हक्क, कर्तव्य यांचा विचार करूनच मतदाराचा हक्क बजावावा असे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी श्री. एस. टी. पाटील (मंडळ अधिकारी खालगाव), श्री. संदेश काताळे (बीएलओ केंद्र क्रमांक 266 135 चाफे), श्री. प्रदीप देसाई, संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.अवनी नागले, प्रा. कविता जाधव, प्रा. शामल करंडे, प्रा. दिपाली सावंत व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.