(नाशिक)
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या येवल्यातील सभेवेळी अपघाताची घटना घडली होती. जेसीबीतून पुष्पवृष्टी करताना खाली पडून चार जण जखमी झाले होते. अपघातग्रस्त चारही तरूणावर येवला, नाशिक, कोपरगाव आदी ठिकाणी उपचार सरु होते. यातील कोपरगाव तालुक्यात उपचार घेत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमी तरुणाची भेट घेतली होती. गोकुळ कदम असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
पहिल्या टप्प्यातील उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील राज्यात दौरा करत होते. ठिकठिकाणी त्यांच्या सभांचे आयोजन केले जात होते. यावेळी त्यांची येवल्यात जाहीर सभा आजोजित केली होती. येवला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जरांगे यांची 9 ऑक्टोबरला जाहीर सभा होती. यावेळी जरांगे पाटील सभेसाठी आल्यानंतर त्यांच्यावर काही युवकांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी केली होती. यावेळी जेसीबीतून पडून चार जण जखमी झाले होतो. या चारही युवकांवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गोकुळ कदम याचा मृत्यू झाला आहे.