ईडीने मणप्पूरम ग्रुपच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी मणप्पूरम फायनान्सचे प्रवर्तक व्ही.पी. नंदकुमारांच्या निवासस्थानासह कार्यालयावर छापे टाकले. मणप्पूरम फायनान्स लिमिटेड समूहाने 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी जमा केल्या असल्याची तसेच केवायसी नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात रोखीचे व्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाली होती.
ईडीने बुधवारी उशिरा केरळ राज्यातील त्रिसूर येथील मणप्पूरम फायनान्स लिमिटेड समूहाच्या अनेक कार्यालयांवर छापे टाकले. ईडीच्या या कारवाईत ग्रुपचे प्रवर्तक व्ही.पी. नंदकुमार यांच्या मुख्यालय आणि निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीशिवाय केवळ मिळालेल्या माहितीच्या आधारावर ईडीने मणप्पूरम फायनान्स लिमिटेड समूह आणि त्याच्या प्रवर्तकावर हे छापे टाकले आहेत.