(जीवन साधना)
मंदिरात गेल्यानंतर मनाला शांती मिळते. यामुळे लोक मंदिरात जातात, परंतु येथे दर्शन करण्यामागे दडलेले कारणं फार कमी लोकांना माहिती असावे. वास्तवामध्ये मंदिरात दर्शन घेण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सकारात्मक उर्जा प्राप्त करणे हे आहे. ही सकारात्मक उर्जा शरीरातील पाचही इंद्रिय सक्रिय असले तरच ग्रहण केली जाऊ शकते.
मंदिराची संरचना आणि ठिकाणामागचे वैज्ञानिक कारण
मंदिर उभारणीसाठी नेहमी सकारात्मक उर्जा जास्त असलेले ठिकाण निवडले जाते. एक असे ठिकाणी जेथे उत्तरेकडून सकारात्मक रुपात चुंबकीय आणि विद्युत तरंगांचा प्रवाह असेल. सामान्यतः अशाच ठिकाणी मोठ्या मंदिराचे निर्माण केले जाते, ज्यामुळे लोकांना जास्तीत जास्त सकारात्मक उर्जा मिळू शकेल.
मंदिरांमध्ये घंटा लावण्यामागचे कारण
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराबाहेर लावलेली घंटा वाजवली जाते. यामागे असे कारण आहे की, घंटा वाजवल्यानंतर यामधून निघणारा आवाज सात सेकंद घुमतो आणि शरीरातील सात हिलिंग सेंटर्सला सक्रिय करतो.
चप्पल मंदिराबाहेर का सोडली जाते
मंदिरमध्ये अनवाणी पायाने प्रवेश करावा लागतो, हा नियम जगातील प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये आहे. यामागे वैज्ञानिक कारण असे आहे की, प्राचीन काळात मंदिरांच्या फ्लोरिंगचे निर्माण अशाप्रकारे केले जात होते की, हे फ्लोरिंग इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक तरंगांचा सर्वात मोठा स्रोत होता. या फ्लोरिंगवर अनवाणी पायाने चालल्याने जास्तीत जास्त उर्जा पायांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू शकत होती.
देवाची मूर्ती
मंदिरामध्ये देवाची मूर्ती गाभाऱ्याच्या अगदी मधोमध असते. असे मानले जाते की, या ठिकाणी सर्वात जास्त उर्जा असते आणि गाभाऱ्यात सकारात्मक विचारांनी उभे राहिल्यास शरीरात सकारात्मक उर्जा पोहोचते आणि नकारात्मकता दूर होते.
आरतीवर हात फिरवण्यामागचे वैज्ञानिक कारण
आरती झाल्यानंतर सर्व लोक दिवा किंवा कापुरावर हात ठेवून नंतर डोळ्यांना आणि डोक्याला हाताने स्पर्श करतात. असे केल्याने हलक्या गरम हातांच्या स्पर्शाने दृष्टी इंद्रिय सक्रिय होते आणि मनाला शांततेची जाणीव होते.
मूर्तीवर फुल अर्पण करण्याचे कारण
देवाच्या मूर्तीवर फुल अर्पण करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. असे केल्याने मंदिर परिसरात सुगंधी वातावरण राहते. अगरबत्ती, कापूर आणि फुलांचा सुवास आत्मिक शक्ती वाढवण्यास सहायक ठरतो आणि मन प्रसन्न राहते.
प्रदक्षणा घालण्यामागाचे वैज्ञानिक कारण
प्रत्येक मुख्य मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षणा घातली जाते. प्रदक्षणा 8 ते 9 वेळेस घातली जाते. प्रदक्षिणा घालताना सर्व सकारात्मक उर्जा शरीरात प्रवेश करते आणि मनाला शांती मिळते.
@ यशवंत नाईक