(मंडणगड/प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील, आंबडवे उपकेंद्र अंतर्गत शिगवण बुद्धवाडी येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आंबडवे यांच्या मार्फत संयुक्त कुष्ट रुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण अभियान राबवण्यात आले. सक्रिय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान हर घर सर्वेक्षणातून करण्यात आले.
दरम्यान या अभियानादरम्यान गावागावात जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेऊन आजाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच या आजाराबाबत दुष्परिणाम आणि लोकामधील गैरसमज याचीही माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनीही या अभियानात उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, आंबडवेचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. असीबखान पठाण, डी. डी.झोरे, आशा मयुरी जगताप, सुहानी गोठलं, निधी भाटकर उपस्थित होत्या.