( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील आंबेकरवाडी येथे 35 वर्षीय तरुणाने दारुच्या नशेत गवत मारण्याचे विषारी औषध प्यायल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दत्ताराम यशवंत आंबेकर (35, आंबेकरवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम याला दारु पिण्याचे व्यसन असल्याने दारुच्या नशेत त्याने गवत मारण्याचे ग्रामोक्झोन औषध प्राशन केले. सायंकाळी 4 वा. च्या सुमारास तो अत्यवस्थ स्थितीत दिसून आला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार वाजे करत आहेत.