(इस्तानबूल)
तुर्की आणि सीरियातून भूकंपात हानी झालेले अनेक हृदयद्रावक फोटो आणि व्हीडीओ समोर येत आहेत. दोन्ही देशांमध्ये भूकंपांने हाहाकार माजवला आहे. भूकंपातील मृतांची संख्या आता १५००० च्या पुढे गेली आहे. यातच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हीडीओ समोर आला आहे. व्हीडीओमध्ये एक सात वर्षांची सीरियन मुलगी तिच्या लहान भावाला ढिगा-यातून वाचवताना दिसत आहे. ती ढिगाऱ्याखाली दबली गेली असली तरी ती आपल्या भावाचे रक्षण करत असल्याचे यात पाहायला मिळत आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जबाबदारी या व्हीडीओ मधून दिसून येत आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी हा व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, मी या धाडसी मुलीचे खूप कौतुक करतो. संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी मोहम्मद सफा यांनीही हा व्हीडीओ ट्विटरवर शेअर केला. त्यांनी ट्विट केले की, “७ वर्षांची मुलगी तिच्या लहान भावाचे संरक्षण करत आहे. ते १७ तास ढिगा-याखाली दबले आणि सुरक्षित आहेत.”