(ऑटो)
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती होत आहे. iVOOMi Energy या कंपनीने भारतात नवीन JeetX लिमिटेड एडिशन स्कूटर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. नवीन स्कूटरची किंमत 1.02 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. परंतु ग्राहकांसाठी ही स्कूटर मर्यादित कालावधीसाठी 98,000 रुपयांच्या (एक्स-शोरूम) सवलतीत खरेदी करता येणार आहे. ही स्कूटर 10 नोव्हेंबरपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
याशिवाय कंपनीने आपल्या ‘बिग एनर्जी फेस्ट’चा भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांवर सवलत जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक सर्व iVOOMi हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरवर 4,000 रुपयांच्या सवलतीसह विशेष फायदे घेऊ शकतात.
कंपनी ग्राहकांना 5,000 रुपये किमतीच्या गिफ्ट्स आणि अॅक्सेसरीज मोफत देत आहे. या ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहेत. नवीन iVOOMi JeetX लिमिटेड एडिशन स्कूटर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
दरम्यान, नवीन ऑफर सर्व iVOOMi डीलरशिपवर उपलब्ध आहेत. कंपनी आपल्या ई-स्कूटर्सवर झिरो डाउन पेमेंटसह दरवर्षी 7% च्या किमान व्याजदरासह स्कूटर उपलब्ध करत आहे. वाहनांच्या ऑन-रोड किमतींवर 100% पर्यंत फायनान्स देखील केला जात आहे.