(कोलंबो)
आशिया कप २०२३ च्या सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा ६ धावांनी पराभव केला. एकीकडे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु भारताचा सलामीवीर शुभमन गिलने सुरुवातीपासून चिवट फलंदाजी करीत सर्वांची मने जिंकली. त्याने शतक झळकावत एक वर्ल्ड रेकॉर्ड केला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा एकमेव फलंदाज मैदानात टिकून राहिला. त्याने या सामन्यात शतक तर झळकावले. पण या शतकासह इतिहासही रचला. अर्थात, गिलने या वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडला. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला. कारण आतापर्यंत जगभरातील कोणत्याही खेळाडूला वनडे क्रिकेटमध्ये वर्षात १ हजार धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
तत्पूर्वी बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी २६६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताचा संघ २५९ धावात ऑल आऊट झाला. भारताकडून शुभमन गिलने झुंजार १२१ धावांची शतकी खेळी केली तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. परंतु थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला.
बांगलादेशविरुद्धच्या आशिया कपच्या वनडेमध्ये शुभमन गिलचं शतक व्यर्थ ठरलं. या सामन्यात टीम इंडियाचा 6 रननी पराभव झाला आहे. बांगलादेशने दिलेल्या 266 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 49.5 ओव्हरमध्ये 259 रनवर ऑलआऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच बॉलला आऊट झाला, तर तिलक वर्मा 5 रनवर, केएल राहुल 19 रनवर आणि इशान किशन 5 रनवर आऊट झाले.
टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू आऊट होत असताना शुभमन गिलने एक बाजू लावून धरली, पण त्याला दुसऱ्या कोणत्याच खेळाडूची मदत मिळाली नाही. गिलने 133 बॉलमध्ये 121 रनची खेळी केली, यामध्ये 8 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. अक्षर पटेलने 34 बॉलमध्ये 42 रन केले, पण त्याला शेवटपर्यंत खेळून भारताला विजय मिळवून देता आला नाही. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या तर तनझिब शाकिब आणि मेहेदी हसन यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर शाकिब अल हसन आणि मेहेदी हसन मिराझला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारताने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर 6 ओव्हरमध्येच बांगलादेशच्या तीन विकेट गेल्या होत्या. सुरूवातीला विकेट गमावल्यानंतर मात्र बांगलादेशच्या बॅटरनी डाव सावरला. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 265 रन केले. कर्णधार शाकिब अल हसनने 80 रनची तर तौहिद हृदोयने 54 रनची खेळी केली. आठव्या क्रमांकावर आलेल्या नसुम अहमदने 44 आणि नवव्या क्रमांकाच्या मेहेदी हसनने नाबाद 29 रन केले, तर तनझिम हसन 14 रनवर नाबाद राहिला.
बांगलादेशविरुद्धच्या सुपर-4 सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टीममध्ये मोठे बदल केले. या सामन्यासाठी भारतीय टीममधून विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, त्यांच्याऐवजी तिलक वर्मा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा मैदानात उतरले.
फायनलमध्ये भारत-श्रीलंका
भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी आशिया कपची फायनल होणार आहे. 7 वेळा आशिया कप चॅम्पियन झालेली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध प्रेमदासा स्टेडियमवर खेळेल. श्रीलंकेने सुपर-4 च्या सामन्यात भारताला 213 रनवर आऊट केलं होतं. श्रीलंकेचा युवा स्पिनर वेलालागेनं टीम इंडियाच्या 5 विकेट घेतल्या होत्या, पण तरीही या सामन्यात भारताचा विजय झाला होता.