(रत्नागिरी)
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे. येत्या ७ मे रोजी भारतरत्न काणे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पां. वा. काणे यांचे योगदान यावर हा ऑनलाइन वेबिनार होणार आहे.
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे हे एक प्रख्यात संस्कृत विद्वान आणि इंडोलॉजिस्ट होते. त्यांच्या योगदानासाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले संस्कृत विद्वान आणि भारतशास्त्रज्ञ होते. धर्मशास्त्र, साहित्य इत्यादी विविध क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे आणि आजही संशोधन विद्वानांसाठी ते मार्गदर्शक आहे. ७ मे रोजी काणे यांची जयंती आहे. यानिमित्ताने या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मे रोजी सकाळी 10:30 पासून झूम मीटिंगवर हा वेबिनार होणार आहे. याकरिता लिंक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली जाणार आहे.
या बेविनारमध्ये अल्माटी, कजाकिस्तान येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ओरिएंटल फॅकल्टीच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. लॉरा येरेकेशीवा, सुप्रसिद्ध संस्कृत विद्वान गौतम पटेल, प्रमुख पाहुण्या संस्कृत संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्षा डॉ. कला आचार्य आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात जास्तीत जास्त संस्कृत विद्वान, विद्यार्थी आदींनी सहभागी होण्याचे आवाहन रजिस्ट्रार डॉ. रामचंद्र जोशी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, समन्वयक आशिष आठवले आणि कश्मिरा दळी यांनी केले आहे.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी नोंदणी फॉर्म भरावा –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjQdTaBjW0rccgA5v2Dq0IeG3N1YlVcnaGVZxmIvMohQL0cg/viewform?usp=sf_link
अधिक माहिती 8600526882, 9028494199 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.