(चिपळूण)
कोंकण विभागामध्ये भात हे मुख्य पीक असून रत्नागिरी जिल्ह्यात भात ह्या पीकाबरोबर नाचणी सुद्धा घेतली जाते. ही शेती पुर्णतः पावसावर अवलंबुन असते आणि शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह पुर्णपणे ह्या शेतीवरच अवलंबुन असतो, मात्र भात पिकावर पडणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे या रोगांवर आळा घालण्यासाठी किडींचे नियंत्रण कसे करावे याची माहिती शेतकऱ्यांना असली पाहिजे, असे डॉ. पांडुरंग मोहिते यांचे मत आहे.
गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यायलय मांडकी-पालवन तर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत गटसमुह चर्चा आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी भात पिकावर येणारे कीड, रोग आणि त्यांचा नुकसानीचे स्वरूप तसेच त्यांचा बंदोबस्त कोणत्या प्रकारे करायचा ह्याविषयी स्लाईड शो च्या आधारे शेतकरी बंधूंना माहिती दिली आणि एकात्मिक कीड आणि रोग पद्धतीचा वापर कसा करावा याबद्दल माहिती सांगितली. या कार्क्रमाअंतर्गत शंका समाधान, कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उपाय योजना कशी करावी ह्याबद्दल समाधानकारक चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचे प्राध्यपक डॉ. पांडुरंग मोहिते, तसेच गावचे उपसरपंच श्री. मनोज डिके आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी युगंधरा गटाचा प्रमुख साक्षी सावंत तसेच सदस्य श्रावणी शिंदे इनामदार, आकांक्षा तांबे, प्राची सनगरे, सुहानी सावंत, वैष्णवी तिकुटे, ज्योती ठाकरे, देव्यानी शेट्टीयार, सुरभी सुकेश, मेखा एम.एस. , अम्रीथा एम. एस., शिनी जॉन, अनीना जेम्स या सर्वांची साथ लाभली