(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. काही महिन्यापूर्वी जयगड समुद्रात मच्छिमारांना डॉल्फिनचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये समुद्रात डॉल्फिनची झुंबड पाहायला मिळाली.
या समुद्रात डॉल्फिनचा वावर असल्याचे दिसून आले. रत्नागिरीतील गणेश खवळे यांनी ड्रोन कॅमेरात या डॉल्फीनला कैद केले आहे. डॉल्फिनला पाहण्यासाठी आता अनेकजण ड्रोन कॅमेराने भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळत आहेत.