( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी-पावस रस्त्यावरील भाट्ये नर्सरी समोर विदेशी दारु विक्रीसाठी नेणाऱ्या मोटारीवर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनायक रामचंद्र बांदरकर (वय ४०, बांदरकरवाडी, नाटे ता. राजापूर) हे मोटार (क्र. एमएच- ०८ आर ५५०४) मधून दारु वाहतूकीचा परवाना नसताना मोटारीच्या डिक्कीतून विदेशी दारु विक्रीसाठी वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले. या प्रकरणी पोलिस नाईक संकेत महाडीक यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.