(देवरूख / प्रतिनिधी)
भारतिय जनता पार्टीच्या संंगमेश्वर तालुकाध्यक्ष पदी हातिव गावाचे सुपुत्र युवा कार्यकर्ते रूपेश कदम यांचा नियुक्ती करण्यात आली आहे.
रूपेश कदम हे माजी जिप अध्यक्ष सौ. रश्मी कदम यांचे सुपूत्र. आहेत. यांच्याकडून त्यांना राजकिय वारसा मिळाला आहे. रश्मी कदम या तीनवेळा जि. प. सदस्या, जि. प. अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्या राहिल्या आहेत.
रूपेश कदम हे भाजपमध्ये सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी २०१६ ते २०२० मध्ये भाजप युवा मोर्चाच्या संंगमेश्वर तालुकाध्यक्ष पद२०२० ते २०२३ मध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी पक्षाकडून मिळालेली जबाबदारी ही संधी समजून पक्षबांधणीवर भर दिला.
तसेच त्यांनी शिवप्रताप प्रतिष्ठान स्थापन करून हिंदुत्व विचारसरणीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करीत आहेत. ओझरे जि. प. गट त्यांनी ३ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकाविणेत योगदान दिले. . त्यांनी आजवर पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. पक्षासाठी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर संंगमेश्वर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
रूपेश कदम हे भाजपचे युवानेते नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर जनतेच्या समस्या उचलून धरत अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यांचा विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. त्यांचे सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर भाजप पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहेत. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रूपेश कदम यांचा संपुर्ण तालुकात पक्षसंघटना वाढीवर लक्ष केंद्रीत करून बुथ सक्षम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे सरकारच्या योजना व विचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्षात तरूणांचा भरणा कसा होईल यावर विषेश लक्ष देवून पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडू असा विश्वास व्यक्त केला आहे
तसेच तालुक्यात सर्व ठिकाणी शक्ती केंद्रप्रमुख नेमण्यावर लक्ष देणार असून प्रत्येक बुथ प्रमुखांना सक्षम बनवून पंचायत समिती व देवरूख नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे निवडीनंतर त्याचे मावळते तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव. जिल्हा ओबीसी सेलचे अभी शेट्ये, राहूल फाटक, मिथून निकम, विनोद म्हस्के यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.