( संगमेश्वर )
तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कडवई येथे बुधवार दिनांक 29नोव्हेंब रोजी शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विज्ञान विभागा मार्फत करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन पालक शिक्षक संघाचे सदस्य संजय उजगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात प्राथमिक स्तरावरील 15 व माध्यमिक स्तरावरील 15 अश्या एकूण 30 उपकरणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी 28 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
विज्ञान प्रदर्शन प्राथमिक गट निकाल पुढीलप्रमाणे
स्वराज चव्हाण व स्वानंद सुर्वे प्रथम,संगीत मोहिते व आर्यन उजगांवकर द्वितीय, नील कांबळी व साईराज सुर्वे तृतीय तर माध्यमिक गटात आदर्शा मोहिते व सिद्धी कानाल प्रथम, सागर बने व मिलिंद जांगली द्वितीय, सुस्मिता पंडव व सायली वाडकर तृतीय. प्रश्नमंजुषा स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे : प्राथमिक क्षितिज सरमोकादम व स्वराज चव्हाण प्रथम, सिध्दी उजगावकर व अर्णवी कानाल द्वितीय, श्रेया धामणाक व सृष्टी पाले तृतीय तर माध्यमिक गट सानिका कुंभार व तन्वी मादगे प्रथम, मधुरा रेडिज व मनस्वी व ओकटे द्वितीय, मनश्री कडवईकर व दिप्ती अवघडे तृतीय . विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने इस्त्रोच्या चांद्रयानावर आधारित सुंदर रांगोळी कलाशिक्षक सोमनाथ कोष्टी व विद्यार्थी मनश्री कडवईकर, सार्थक पंडित व यश जाधव यांनी रेखाटली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर नाटिका सादर केली. या नाटिकेला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमाला सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, सदस्य अनिस खान,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी भेट दिली. या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, पर्यवेक्षक संतोष साळुंखे ,प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.परीक्षक म्हणून आशिष सरमोकादम समीर भालेकर, प्रदीप कानाल,शुभम शिंदे सर,नयना राजेशिर्के,शशिकांत किंजळकर, सीमिन काझी, आप्पासाहेब शेंडगे व सिध्दी सुर्वे यांनी काम केले.
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष, सचिव, सर्व संस्था पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभाग प्रमुख सुरज मंगेश कदम यांनी विशेष मेहनत घेतली त्यांना विज्ञान शिक्षिका सौजन्या महाडिक, सिध्दी सुर्वे, सिमिन काझी, निलेश कुंभार, शशिकांत किंजळकर, राजेश खेडेकर, संजय घोसाळकर, प्रशांत साळवी, अरविंद सुर्वे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी केले.