(मुंबई/किशोर गावडे)
जळगावहून आपल्याला मित्रांना भेटण्यासाठी आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाला रुणवाल ग्रीन्स समोरील पाटील मैदान येथे चार तरुणांनी बेदम मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल व अन्य किंमती वस्तूंची चोरी करून लूटमार करणाऱ्या तीन इसमांना भांडुप पोलिसांनी मुद्देमालासह अटक केल्याची घटना समोर आली आहे दि. 08 सप्टेंबर रोजी दरम्यान घटना घडल्याचे वृत्त हाती आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ आयुब खाटीक वय 23 वर्ष हा त्यांचे साथीदाराची पाटील मैदान, रुणवाल ग्रीन्स जवळ, एल. बी. एस. रोड, भांडुप (पश्चिम) येथे आपल्या मित्रांची वाट पाहत थांबला होता. इतक्यात चौघे तेथे आले व आसिफ खाटीकला बेदम मारहाण केली. त्याच्या जवळील RealMe कपंनीचा C20 मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. तसेच खाटीक यांना धमाकावत त्यांचे मोबाईल फोन पे अप्लिकेशनचा पासवर्ड घेऊन पळून गेले. खाटीक यांने भांडूप पोलीस ठाणे येथे पोलिसांना माहिती दिली व फिर्याद दाखल केली.
पो.उप. नि अभिजीत टेकवडे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी घटनास्थळी पोचल्यानंतर घटनास्थळानजीकचे CCTV फुटेज चेक केले असता काही इसम हे संशयास्पद हालचाली करताना दिसून आले होते. प्राप्त CCTV फुटेजवरून गुन्हे प्रकटीकरणं पथकाने आरोपी नामे सद्दाम उर्फ मस्तान यास झकरिया कंपाउंड, सोनापूर, भांडुप येथून ताब्यात घेतले तसेच नमूद आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करून अन्य दोन आरोपी इरफान खान उर्फ इल्ला व स्वप्नील तिवारी उर्फ तौकीर यांना चांद शाह वली दर्गा परिसर, पवई, येथून ताब्यात घेतले व पुढील तपासकामी भांडुप पोलीस ठाणे येथे आणण्यात आले.
भांडुप पोलिसांनी 559/2022 कलम 392 323 504 406 34 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्यातील या सर्व आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या कडून जबरी चोरी झालेली मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले भांडुप विभाग व.पो.नि श्री नितीन उन्हवने व पोलीस निरीक्षक गुन्हे धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नी अभिजीत टेकवडे पो. ना 040957/कासार, पो शि 11.0814/कोळी, पो शि 11.1945/कचरे, पो. शि. 130098/आटपाडकर या पथकाने अखेरीस उघडकीस आणला.