(रत्नागिरी)
भंडारी युवा प्रतिष्ठान आयोजीत भंडारी श्री २०२३ वर्ष ६ वे, रविवार दि. २२ जानेवारी रोजी स्वा.सावरकर नाटयगृहात पार पडली. या स्पर्धेत भंडारी श्री चा मानकरी ठरला तो रत्नागिरीचा श्री.आशिष विलणकर. तर खुल्यागटात समीर मोरे (चिपळूण) विजेता ठरला. बेस्ट पोझर कु.प्रणव कांबळी व हर्षद मांडकर राजापूर, उगवता तारा कु. अमेय किर व सुरेश भाताडे रत्नागिरी, तर जिद्दी भंडारी कु.निलेश तोडणकर विजेते ठरले. सदर स्पर्धा रत्ना.जिल्हा हौशी शरीरसौष्ठोव संघटनेच्या नियमानुसार संपन्न झाली. स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे रत्नागिरीकरांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निवृत्त जिल्हाधिकारी, ज्येष्ठ साहित्यीक श्री.सासने यांचे हस्ते, सहयाद्री वाहिनीचे माजी संचालक श्री.जयू भाटकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत तसेच आर.डी.सी.सी.बॅक संचालक श्री.गजानन तथा आबासाहेब पाटील, उदयोजक श्री.जितेंद्र बागकर, तालुका भंडारी अध्यक्ष श्री. शिवलकर, श्री.मधुकर नागवेकर, मिऱ्याच्या सरपंच सौ.आकांक्षा निलेश किर, सौ.दयाताई चवंडे, शामराव विठ्ल बॅक मॅनेजर श्री.नवले, राजापूर अर्बन बॅंक मॅनेजर श्री.बिर्जे, श्री.वैभव कांबळे, श्री.बावा नाचणकर, श्री.नरेंद्र हातिस्कर, डॉ.मयूरेश पाटिल, श्री.विकीशेठ जैन, श्री.भुपेश भाटकर, श्री.तेजस भाटकर, श्री.कांचन मालगुंडकर, श्री.भाई विलणकर, राष्ट्रिय पंच श्री.संदेश चव्हाण इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
भंडारी युवा प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकत्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व सर्व स्पाँसर्स यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी ठरली. या सर्वांचे आभार अध्यक्ष श्री.निलेश नार्वेकर यांनी मानले.