(मंडणगड)
आपल्याच टेम्पो चालकाच्या पत्नीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून व व्हिडिओ चित्रिकरण करून तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले व याची कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या कात व्यावसायिक विजय सिताराम काते (रा. बर्गेवाडी, ता. मंडणगड) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
७ ऑगस्ट रोजी पीडित महिलेने आरोपी विजय काते याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही महीला आदीवासी समाजातील आहे. विवाहिता आंबी फाटा येथे तक्रार दाखल करून आठ दिवस झाले तरी मंडणगड पोलिसांनी आरोपीला अद्यापही अटक केलेली नाही. यातील आरोपी विजय काते हा फरार असून तो गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे, तर आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी खेड सत्र न्यायालयात अर्ज केला असल्याचे समजते. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शैलजा सावंत-बोबडे करीत आहेत.