( मुंबई )
मध्य प्रदेशातील मुरैना येथे शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. सुखोई-३० आणि मिराज २००० ही दोन विमाने ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण घेत असताना कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी दोन्ही विमान सराव करत होती. अपघातानंतर पायलटबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी. पण अनेक रिपोर्ट्समध्ये विमानाच्या ढिगाऱ्याजवळ एक हात कापला गेला आहे आणि तिथे रक्त असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही घटनास्थळी जाऊन तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लोकांनी सांगितले- आकाशात आग लागली, वेगाने जमिनीकडे आली…
या घटनेच्या संदर्भात असे सांगण्यात आले आहे की ही दोन्ही विमाने म्हणजेच सुखोई-३० आणि मिराज २००० मुरैना जिल्ह्यातील पहाडगड विकास ब्लॉकजवळील जंगलात कोसळल्याचे वृत्त आहे. स्थानिकांनी सांगितले की, आकाशात आग लागलेली दोन विमाने वेगाने जमिनीकडे येताना दिसली. विमानाचे अवशेष जंगलात दूरवर पसरले असल्याचे सांगण्यात येत आहे. सुखोई-३० मध्ये दोन पायलट आणि मिरजमध्ये एक पायलट असल्याचेही सांगण्यात येत आहे. दोन्ही वैमानिकांच्या प्रकृतीबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विमान अपघाताबाबत ट्विट केले आहे. यासोबतच प्रशासनाला तातडीने मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शिवराज सिंह यांनी लिहिले की, मुरैना येथील कोलारसजवळ हवाई दलाच्या सुखोई-३० आणि मिराज 2000 विमानांच्या अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाला जलद बचाव आणि मदत कार्यात हवाई दलाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमानांचे पायलट सुरक्षित राहोत अशी मी देवाला प्रार्थना करतो.