( पुणे )
आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यांची इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री बोगस? असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सामंत यांचे शिक्षण डिप्लोमा ऑटोमोबाईल ही डीग्री ज्ञानेश्वर विद्यापीठ पुणे या ठिकाणाहून शिक्षण घेतल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठाला कोणत्याही स्वरूपाची विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेले हे विद्यापीठ आहे. त्यामुळे या विद्यापीठाला शासनाने यापूर्वीच बनावट विद्यापीठ म्हणून घोषित केलेला आहे.
अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांची शैक्षणिक डिग्री ही बोगस विद्यापीठातून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाला कुठल्याही प्रकारची शासकीय मान्यता नाही. परंतु ज्यावेळेस निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले त्यामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या डीग्रीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून अधिवेशनात आता उदय सामंत यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.