( दापोली / प्रतिनिधी )
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आज सकाळच्या सुमारास एक बोट किनाऱ्यावर लागल्याने खळबळ उडाली . मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झले होते . या बोटीमध्ये कोणीही व्यक्ती नसून बेवारस स्थितीत आहे . मुरुड किनाऱ्यावर ही बोट वाळूत रुतलेल्या स्थितीत आढळून आली .
मच्छिमारांनी याबाबतची माहिती पोलीस आणि तटरक्षक दलाला दिली . पोलीस घटनास्थळी दाखल झाले . बोटीची चौकशी करण्याचे काम सुरु आहे . ही बोट समुद्रातील लाटांमुळे किनाऱ्यावर आदळून फुटली आहे . तटरक्षक दलाचे अधिकारीही या ठिकाणी दाखल झाले . या बोटीबाबत नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही असे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले . किनाऱ्यावर बेवारस स्थितीत सापडलेली बोट म्हणजे पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो एक भाग असल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले .