( रत्नागिरी )
शहरातील बैलबागमधील प्रसिद्ध श्री कालभैरव मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. सकाळी नऊ वाजता श्री देव कालभैरव श्री देव होळीदेव, श्री महापुरुष देवांवर यथासांग अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी बारा ते तीन या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरवासीयांसह तालुक्यातील भाविकांनी या महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता भजन व रात्री साडेआठच्या दरम्यान महाआरती आयोजित करण्यात आली होती. भाविकांनी सहकुटुंब व मित्र परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.