(मुंबई)
बँकांमध्ये अनेकांचे पैसे पडून असतात, मृत्युनंतर पुढे ते तसेच खात्यावर राहतात. अनेकांच्या मृत्यूनंतर बँकांमध्ये राशी जमा असते, त्याचेही पुढे काही होत नाही. त्यामुळे आता आरबीआयने एक पोर्टल सुरु केले आहे. त्याद्वारे बेवारस खात्यावरील रकमेची माहिती मिळवता येणार आहे.
आरबीआयच्या वतीने एक रीलीज जारी करण्यात आले आहे. बँका आपल्या वेबसाईटवर वेबारस रकमेची आणि खात्यांची माहिती देत असतात. खातेधारक आणि लाभार्थी यांना सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध होणार असून डेटाची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. आरबीआयने त्यासाठीच आता एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी बेवारस रकमेच्या शोधासाठी यूडीजीएएम नावाचे एक वेब पोर्टल लाँच केले आहे. आरबीआयने या पोर्टलच्या ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी अनेक बँकांमधील रकमेची माहिती दिली आहे. यूडीजीएएम पोर्टलच्या मदतीने ग्राहक सोप्या पद्धतीन ठेवी आणि खाती सहजपणे शोधू शकतील.
या पोर्टलद्वारे ग्राहक त्यांच्या बँकांमधील वैयक्तिक सेव्हिंग खाती सक्रिय करू शकतातकिंवा न वापरलेली ठेव रक्कम गोळा करू शकतात. आरबीआयने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार हे पोर्टल सहभागी संस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस यांच्या भागीदारीत तयार केले आहे.