(रत्नागिरी)
शहरातील बेलबाग येथील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी (दिनांक ११ सप्टेंबर २०२३) सायंकाळी ७.४५ वा. करण्यात आली.
मोहम्मद अब्बास मुकादम (४७, रा. अजमेरीनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी शहर पोलिस बेलबाग येथे गस्त घालत असताना त्याठिकाणी त्यांना संशयित हा २७५ रुपयांची ५ लिटर गावठी दारू विक्री करण्यासाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना मिळून आला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.