(रत्नागिरी)
शहरातील चर्च रोड येथील एका घराच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे गावठी दारुची विक्री करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १३ जुलै रोजी रात्री ८ वा. करण्यात आली.
या कारवाईत संशयित सर्फराज अहमद शहा (३२, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री शहर पोलिस चर्चरोड परिसरात गस्त घालत असताना त्यांना त्याठिकाणी एका घराच्या पाठीमागे संशयित हा गावठी दारू विक्रीसाठी आपल्या जवळ बाळगून असलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याच्याकडून ९५० रुपयांची १८ लिटर दारू जप्त करण्यात आली असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.