(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उद्यमनगर-झाडगाव येथील ऑर्चित गॅलेक्सी बिल्डिंगच्या पार्किंगनजीक सांडपाणी चेंबरमध्ये दगड टाकून तसेच फोडून २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जमीर पागारकर, जमीर यांची पत्नी आणि एक महिला असे संशयित आहेत. ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी एकच्या सुमारास ऑर्चित गॅलेक्सी बिल्डिंगच्या पार्किंग ठिकाणी चालू असलेल्या फ्रिलिक्स काँक्रिटचे काम करत असताना निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नावे असलेली ऑर्चित गॅलेक्सी बिल्डिंगच्या ठिकाणी पार्किंगचे काम सुरू होते. संशयितांनी या ठिकाणी अनधिकृतपणे प्रवेश करून या जागेतील सांडपाण्याच्या चेंबरमध्ये दगडी टाकल्या तसेच चेंबर फोडून २ लाख ५० हजाराचे नुकसान केले.