( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील बावनदी मार्गे तीन जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसाना सोमवारी सायंकाळच्या सुमारास मिळाली. पाली येथे पोलिसांनी सापळा रचला. मात्र गाडी देवतळे मार्गावरून गाडी जात असल्याची कळल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने आपली गाडी वळवून गाडीसह एकाला अटक केली. शशांक सावंत (19, साठरे बांबर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताने नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही घटना सोमवार २६ डिसेंबर २०२२ रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान पोलिसानी कत्तलिसाठी गुरे घेऊन जाणारी गाडी पकडल्याचे समजताच प्राणी प्रेमी व बजरंग दल व विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आणि काही तरुणांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात धडक दिली. शेकडोच्या संख्येने लोक ग्रामीण पोलीस स्थानकावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धडकले. कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक झाले होते. योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या त्या चालकाच्या बचावासाठी काही राजकीय पुढाऱ्यांचे पोलिस स्थानकात फोन गेल्याचे समजते.
पोलिसांना बोलेरोच्या झडतीत 3 बैल गाडीत कोंबून भरल्याचे दिसून आले. पोलिसांनी गाडी सह चालकांना रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आणण्यात आले. एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.