(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर नावडी (गणेश आळी) येथील नवोदित गायिका कु. युगा विनय कोळवणकर ( इ. ७ वी ) हिने भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या गायनाच्या प्रारंभिक परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केल्याने तिचा संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुरेश ठाकूर गावित यांच्या हस्ते तीला ‘विश्व समता’ प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच उपनिरीक्षक श्री शंकर नागरगोजे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करण्यात आला. महिला दक्षता कमिटी ज्येष्ठ सदस्य सौ. माधवी मनोहर भिडे यांनीही भेटवस्तू देऊन युगा विनय कोळवणकर हिचे अभिनंदन केले.
विश्व समता कला मंच लोवले संगमेश्वर चे संस्थापक व अध्यक्ष श्री. जाधव तसेच मार्गदर्शक दिनेश आंब्रे यांनी याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना युगा विनय कोळवणकर हिने आपल्या गायन कलेच्या गुरु कु. निहाली अभय गद्रे यांच्या बद्दल आदर व्यक्त केला. युगाच्या या सन्मानामुळे संगमेश्वर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.