(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी निकोप आरोग्यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन मोफत वितरित करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्यामार्फत गतवर्षी जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब आणि होतकरू दूर गावातून पायी चालत येणाऱ्या मुलींसाठी मोफत सायकल पुरविल्या होत्या. यावेळी बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे मोफत वितरण करण्यात आले.
रोटरी क्लबच्या उपक्रमशील व धडाडीच्या अध्यक्षा ॲड.सौ. शाल्मली विनय आंबुलकर व त्यांच्या टिमच्या नेतृत्वाखाली सदरची मशीन देण्यात आली. वितरणप्रसंगी रोटरी क्लबचे सेक्रेटरी बिपिनचंद्र गांधी, क्लबच्या सौ. गांधी, सौ.करे, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, सौ.स्नेहल माने,शिवानंद गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.
फोटो – जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन प्रदान करताना क्लबच्या अध्यक्षा ॲड.सौ. शाल्मली आंबुलकर व सोबत रोटरी क्लबचे पदाधिकारी (छाया – संतोष पवार, जाकादेवी)