(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील कौंढरताम्हाणे भुवडवाडी येथे एकाला तिघांनी लाकडी रिप व बांबूने मारहाण केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संजय तानाजी आग्रे (48, कौंढरताम्हाणे भुवडवाडी ) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आग्रे हे घरी जेवण गरम करत असताना तिघेजण त्यांच्या रुममध्ये आले. त्यांनी ‘तू तानाजी आग्रेचाच मुलगा आहेस ना. मग तू तंटामुक्तीच्या मिटींगला का नाही आलास‘ असे बोलून संजय आग्रे याला लाकडी रिप व लाकडी बांबूने मारहाण करुन दुखापत केली. याप्रकरणी संजय आग्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास आग्रे, अविनाश आग्रे, संतोष आग्रे (तिघे कौंढरताम्हाणे, भुवडवाडी, चिपळूण) यांच्यावर भादविकलम 324, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.