(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा बहुजन मुक्ती पार्टी आयोजित जनसंवाद परिवर्तन यात्रा मार्गदर्शन मेळावा गुरुवार दि.१८ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत रत्नागिरी येथील जलतरण तलाव मैदान रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला असून सदरचा मार्गदर्शन मेळावा बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या जनसंवाद परिवर्तन यात्रेचे औचित्य साधून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते साळवी स्टॉप सभा स्थानापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन मुक्ती पार्टी रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जनसंवाद परिवर्तन यात्रेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष प्रतेंद्र प्रताप सिंग, बहुजन मुक्तीचे कुशल नेतृत्व श्रीकांतदादा होवाळ, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष लखणदादा चव्हाण ,प्रवक्ते गौरव पणोरेकर ,बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सुजाताताई चौदंते , जिल्हाध्यक्ष बाळा कचरे आदी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. वंशिका पाटील,दापोलीचे विजय जाधव, मंडणगडचे अजय तांबे, दापोलीचे विजय पवार ,संगमेश्वरचे राजेंद्र सावंत ,रत्नागिरीचे फेंमीदा काझी, प्रकाश साळवी ,दीपक पांचाळ, गुहागरचे निलेश पावरी ,रत्नागिरीचे सत्यवान सोनवडकर, गुहागरचे अरुण भुवड, आर्केश मांडवकर, मंडणगडचे ज्ञानेश्वर खांबे, रत्नागिरी येथील विशाल जाधव ,प्रवीण कालकर धनंजय पालकर ,दीपक जुवळे,विजय कुरतडकर यांसारखे अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत..बहुजन शासक बनो, या शीर्षकाखाली महाराष्ट्र राज्यव्यापी जनसंवाद परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळा कचरे यांनी दिली.
जनसंवाद परिवर्तन यात्रेमध्ये बहुजन समाजातील नागरिकांनी व अभ्यासकांनी परिवर्तन यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळा कचरे यांनी केले आहे. या जनसंवाद परिवर्तन यात्रेमध्ये ईव्हीएम वरील निवडणूक न घेता बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यात यावी. ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी, एमएसपी गॅरंटी कायदा लागू करावा, आदिवासींचे विस्थापितिकरण बंद करणे ,शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करणे, न्यू एज्युकेशन पॉलिसी रद्द करणे, अन्न वस्त्र निवारा यांची ३६५ दिवस गॅरंटी देणे ,बेरोजगारी लक्षात घेऊन प्रत्येक हाताला काम द्या, बेरोजगारांना प्रति महिना दहा हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा ,जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करा, अशा मूलभूत अनेक मुद्द्यांवरती जनसंवाद परिवर्तन यात्रेत मार्गदर्शन केले जाणार आहे.