(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी शहरानजिकच्या बसणी बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५,यांचे वतीने नालंदा बुध्दविहार येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम शाखेचे अध्यक्ष गौतम बाबू कदम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाखेतील ज्येष्ठ सदस्या आशा गणपत कदम यांचे हस्ते पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर योगेश कदम व श्रेया कदम यांचे हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच सदस्या मिलन संजय कदम व वैशाली जयवंत कदम यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात धम्म संस्कार पूजापाठाचे कामकाज बौध्दाचार्य सतीश मारुती कदम व श्रामणेर संतोष दिनकर कदम यांनी पाहिले. या कार्यक्रमास बौध्दजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी उपसमिती शिक्षण समिती सभापती जयवंत बापूराव कदम,बसणी गावशाखेचे उपाध्यक्ष रूपेश बाळाजी कदम, कोषाध्यक्ष नितीन मोहन कदम सभासद विकास कृ.कदम, मंगेश कदम, दिनकर कदम, विक्रम कदम, संदीप कदम, दिलीप कदम, वीरसेन कदम, वैभव कदम, महिला अध्यक्षा सुरेखा दिनकर कदम, सोनाली वैभव कदम, पूर्वा कदम, दीपाली कदम, रेश्मा कदम, रसिका कदम, इत्यादी मंडळी उपस्थित होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेतील सचिव राजेंद्र बाबू कदम यांनी केले. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसणी गावशाखेतील सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.