( रत्नागिरी / प्रतिनिधी )
राज्यातील राजकारणात उलथापालथ सुरू असताना रत्नागिरी शहरात देखील राजकारणाला जोर चढला आहे. यातच राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली असून पक्षात प्रवेश देण्यामध्ये बाजी मारली आहे. आजपर्यंत बशीर मुर्तुझा यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये विविध समाज स्तरावर समाजोपयोगी कार्य केली आहेत. यामध्ये शेतकर्यांसाठी, गृहिणींसाठी नवउद्योजकांसाठी अभिनव योजना राबविण्यात आल्या. बशीर मुर्तुजा ही व्यक्ती सतत काही ना काही समाजकार्य करत आहे यांच्या बरोबरीचे लोक राष्ट्रवादी पार्टी सोडून दुसऱ्या पक्षात गेले तिथे जाऊन मोठी पदेही घेतली पण या व्यक्तीने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची धुरा संभालली राष्ट्रवादी बरोबर निष्ठेने काम करत राहिले त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन झाला यामुळेच आज निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत असल्याचे पाहून मतीन बावानी यांनी आपल्या १५० कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तसेच मिरकरवाडा येथील फर्जना मस्तान यांच्या 50 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. बशीर मुर्तुजा हे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असल्यामुळेच या कार्याची पोचपावती शहर राष्ट्रवादीला मिळाल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुस्लीम मेमन समाजाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे वृत्त हाती आले आहे.
रत्नागिरी दि.31 जुलै रोजी मेमन समाज हॉल येथे आयोजित भव्यदिव्य कार्यक्रमात समाजातील युवा, महिला व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीर केले. यामुळे मेमन समाजाचा 100 टक्के पाठिंबा हा राष्ट्रवादीलाच असेल असे चित्र आता दिसू लागले आहे. यामुळे रत्नागिरी शहर परिसरात राजकारणाची दिशा बदलण्यास नक्कीच मदत होणार आहे. राष्ट्रवादी पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची चिन्हे आता दिसू लागली असून यापुढे इतर समाजदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच बशीर मुर्तुझा यांनी केले. यावेळी मिरकरवाडा येथील मुस्लीम समाजातील बंधू-भगिनींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी मतिन बावानी, नावेद बावनी, आकिब बावनी, अमन बावनी, राहील डोसानी, रमिज डोसानी, सिद्दू डोसानी, आवेज अकबानी, मुबीन बावानी, इम्रान बावानी, साजिद मुसानी, हमजा मुसानी, अफझल अकबानी, रमिज अकबानी, बाबासाहेब तांडेल, युसुफ अलजी, नजिर मुल्ला, आसिफ अकबानी, फरजाना मस्तान यांनी प्रवेश केला आहे.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव नौसीन काझी, जिल्हा कार्याध्यक्ष अन्सार मुल्ला, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मेहबूब मोंगल, मेमन समाजाचे नेते आसीफ अकाबनी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे राजाभाऊ लिमये, सुदेश मयेकर रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुदेश भोसलेही उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची मालिका अशीच सुरु राहणार असून विविध पदाधिकार्यांच्या नेमणुका लवकरच करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी शहरातील नेते व जिल्हा महासचिव नौसीन काझी यांनी सांगितले. शहरातील व्यापारी वर्ग, मच्छीमार वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहे याचा परिणाम शहरातील इतर वर्ग ही राष्ट्रवादीमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुदस्सर ठाकूर, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर काझी, तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, महिला तालुका अध्यक्ष शमीम नाईक, शहर अध्यक्ष नेहाली नागवेकर, सायमा काझी आदी मान्यवर उपस्थित होते.