(मुंबई / शांताराम गुडेकर )
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्ष बळीराज सेना पक्ष अध्यक्ष तरूण तडफदार आक्रमक नेतृत्व श्री.अशोक वालम यांच्यावतीने मुंबई सह कोकण विभाग येथे अनेक पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यामध्ये संगमेश्वर तालुका अध्यक्ष पदी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील श्री क्षेत्र मार्लेश्वर पासून जवळच असलेल्या बामणोली गावातील करंडे वाडीचे सुपुत्र, कोकण भूमिपुत्र श्री. नितीन गोविंद लोकम यांची नियुक्ती करण्यात आली.
लोकम यांना पक्ष अध्यक्ष अशोक वालम यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मुंबई उपाध्यक्ष रमेश कानावले उपस्थित होते.अनेक कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊन संपूर्ण महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईसह उपनगर आगामी महानगर पालिका, जिल्ह्य परिषद, ग्रामपंचायत, लोकसभा, विधानसभा निवडणूकीकरीता संघटन मजबूत करून सज्ज होण्यास आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये २२७ वार्ड लढविण्यासाठी भविष्यात उमेदवाराची चाचपणी देखील लवकरच केली जाईल असे मुंबई उपाध्यक्ष नियुक्ती श्री.रमेश कानावले यांनी बोलताना सांगितले.
या नियुक्ती बद्दल कोकणातील अनेक सामाजिक संघटना, समाज शाखा, मंडळ, राजकीय मित्र मंडळी, मित्र परिवार यांनी नितीन लोकम यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत