(चिपळूण / ओंकार रेळेकर)
निवळी येथे साकारण्यात आलेला भव्य दिव्य बने गृहनिर्माण प्रकल्प उभारणीमध्ये आर्किटेक्चर म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत मे.देसाई आर्किटेक्ट कंपनीचा मोठा हात आहे. देसाई आर्किटेक्चर कंपनीचे सर्वेसर्वा प्रमुख दिलीप देसाई यांनी स्वतः लक्ष घालून बने संकुलाची रचना केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बने कुटुंबीयांनी त्यांचे विशेष आभार मानले असून याची दखल शनिवारी खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी घेऊन त्यांचा येथे भव्य सत्कार केला.
निवळी येथील बने परिवार सहकारी गृहनिर्माण संस्था रावंणगवाडीच्या गृहप्रकल्पाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आले. निवळी सारख्या गावात बने कुटुंबीयांच्या माध्यमातून ५० कुटूंबाचे प्रकल्प उभारण्यात आल्याने बने कुटंबाचे आणि आर्किटेक्चर दिलीप देसाई यांचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी कौतूक केले. मुंबईत गेल्यानंतर ही गाव विसरला नाहीत हे या बने वास्तूचे उदाहरण असल्याचे पालकमंत्री म्हणाले, मी जेव्हा पासून आमदार झालो तेव्हा पासून सर्व बने माझे हितचिंतक असल्याचा मला गर्व आहे. इच्छाशक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बने संकुल असल्याचे त्यांनी या कार्यक्रमा निमित्ताने उल्लेख केला. या संकुला मधील माझ्या सर्व बने परिवाराला जी मदत लागेल ती मदत तुमचा आमदार म्हणून देणार असल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, महेश बने, महेश वा. बने,संदीप बने, राजेश बने, संजय बने, सुशांत बने, आर्किटेक्चर दिलीप देसाई, मिलिंद बने, पूजा बने, संदीप बने, प्रशांत बने, प्रभाकर बने, मिलिंद बने, राजश्री बने, सुभाष बने, किशोर बने,सोहंम बने आणि बने परिवार मोठ्या. संख्येने उपस्थित होते.